Godagiri Farms - Our Soil, Our People
Sunday, July 20, 2025
Sahaj Vichar
Sunday, June 1, 2025
*"तण देईल धन – एक हरवलेलं नातं"* ऋषिकेश औताडे, मधमाशी पालक, गोदागिरी फार्म, श्रीरामपूर
तण देईल धन – एक हरवलेलं नातं
ऋषिकेश औताडे, मधमाशी पालक, गोदागिरी फार्म, श्रीरामपूर
मोबा. ९९६०५५३४०७ 
इमेल:
godagirifarms@gmail.com 
पावसाचा पहिला सडा पडतो,
आणि
एक वेगळीच जादू जमिनीवर उलगडू लागते. मातीवर
हिरवळ फुलते. ओलसर मातीचा सुवास,
गवतावर
साचलेले दवबिंदू, आणि त्या गवतात डोलणारी
रानफुलं – हे सगळं किती तरी सुखावणार
असतं. पण आपण फारसं लक्ष देत नाही.
आपल्या
नजरेला हे सगळं “तण”
वाटतं.
गवत
उगवतं, झाडझुडपं पानं टाकतात,
बांधाच्या
कडेने रानफुलं फुलतात – आणि
ते पाहिलं की लगेच हातात खुरपे घेतलं जातं, तणनाशकाची
बाटली उघडली जाते. फार काळजीपूर्वक आपल्या
शेतातलं, अंगणातलं
"तण" काढून
“स्वच्छपण” राखल
जात.
पण यात आपण नकळत एक अतिशय
महत्त्वाचं नातं तोडतो ते म्हणजे मधमाश्यांशी असलेलं आपलं नातं.
पावसाळा
आला की झाडांना फुलं येणं थांबतं. मोठ्या
झाडांवर सध्या फुलं फारशी नसतात. आणि
मधमाश्यांसाठी हीच मोठी अडचण असते. त्यांचं
अन्नच गायब झालेलं असतं.  पावसामुळे फुलामधील पराग व मकरंद अक्षरश धुवून
टाकला जातो. पण निसर्गात एक अद्भुत गोष्ट घडते – गवत,
रानवेली,
झुडुपं...
ही
सगळी लहानसहान झाडं पहिल्या पावसातच फुलायला लागतात. त्यांच्यावर
छोटी, टवटवीत फुलं येतात.
ही
फुलं मधमाश्यांसाठी वरदान ठरतात. अगदी
पहिल्या पावसातच त्या फुलांवर मधमाश्या दिसू लागतात. गुंजारव
करत, हलक्या आवाजात त्या फुलांभोवती
फिरतात. त्याच फुलांवर त्या २-३
महिने जगतात. त्यांचं घर,
अन्न,
आयुष्य
– सगळं त्या गवतावर, त्या
रानफुलांवर आधारलेलं असतं.
पण आपण तेच गवत
“तण” समजतो.
फवारणी
करतो. फुलं येण्याआधीच त्यांचा नायनाट
करतो. आणि नंतर म्हणतो,
“शेतात मधमाश्या येत नाहीत, पोळी दिसत नाहीत”
कधी विचार केलाय का,
लहानपणी
झाडांवर, छपरांवर,
जुन्या
माठांमध्ये, जमिनीला पडलेल्या भेगा मध्ये  मधमाश्यांची
पोळी दिसायची... आता का दिसत नाहीत?
कारण
आपणच त्यांच्या जगण्याचा आधार कापून टाकलाय.
आज
अनेक शेतकरी सांगतात, “फळं
फुलत नाहीत, उत्पादन कमी होतंय.”
त्यात
एक मोठा हात असतो मधमाश्यांचा. पण त्या
दिसेनाशा होतात, तेव्हा निसर्गाचं काम
कोणी करायचं?
तुम्ही
जर मधमाश्यांना मदत केली, त्यांच्या
अन्नासाठी गवत, रानफुलं ठेवली,
फवारणी
थांबवली – तर त्या तुमच्यासाठी परत
येतील. तुमचं परागीकरण करतील.
फुलांना
फळं देतील. तुमचं उत्पादन वाढवतील.
शेती
म्हणजे नुसती माती, पाणी, औजारे , खते  आणि बियाणं नाही. ती
एक सजीव व्यवस्था आहे – जिथं
झाडं, गवत, फुलं,
कीटक,
पक्षी
सगळे मिळून जगतात. आपण जर या साखळीतील एक
दुवा तोडलात, तर सगळा निसर्ग कोसळतो.
मधमाशी ही फक्त मध देणारी
कीटक नाही – ती तुमच्या शेताची
कृषिलक्ष्मी  आहे. आणि
तिचं अन्न म्हणजे हेच “तण”
समजलेलं
गवत आहे.
पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला
गवत दिसेल, तेव्हा क्षणभर थांबा.
पाहा,
त्या
गवतावर फुलं येत आहेत का? मधमाशी
भिरभिरतेय का? एकदा का ते दिसलं,
की
तुम्हाला समजेल – गवत काढण्यापेक्षा ते
जपणं किती महत्त्वाचं आहे.
शेवटी,
मधमाश्या
जर उपाशी राहिल्या, तर निसर्गही उपाशी राहील.
पण
तुम्ही त्यांना फुलं दिलीत, तर त्या
तुमच्या हातात सोनं ठेवून जातील.
आज “तणनाशक” वापरणं
म्हणजे आधुनिक शेतीचं एक मानक तंत्र बनलं आहे. पण हे रसायन केवळ तणच नष्ट करत नाही,
तर
जमिनीतील सूक्ष्मजीवजगतावरही गंभीर परिणाम करते. जमिनीतील बुरशी,
जिवाणू,
गोगलगाय,
गांडुळं
– ही सगळी सूक्ष्म साखळी उध्वस्त होते. परिणामी, जमिनीची
रचना ढासळते, सुपीकता कमी होते,
पाणी
धारण करण्याची क्षमता घटते, आणि
जमिनीची धूप वाढते.
अशा तणनाशकांमुळे काही
देशी रानझाडं, गवत पूर्णतः नामशेष झाली आहेत – ज्या वनस्पती कधीकाळी मधमाश्यांसह
अनेक पक्षी व प्राणी यांचं अन्न होत्या. काही तणांना औषधी गुणधर्म आहेत. उदा. तिळवण,
भेंडी,
अडुळसा
यांसारख्या रानवेली अनेक आजारांवर उपयुक्त ठरतात. गायी, शेळ्या,
म्हशींसाठीही
ही रानफुलं, गवत,
तणं
हे एक उत्तम पोषणमूल्य असलेलं खाद्य आहे – जे त्यांच्या दुधातही फरक घडवते.
हे
तण म्हणजे निसर्गाचा समतोल राखणाऱ्या साखळीतील एक महत्त्वाचा दुवा आहे.
थोडक्यात काय तर..."गवत
सांभाळा, मधमाश्या होतील गोळा
व "गवत राखाल,
तरच
मध चाखाल"
महाराष्ट्रात आढळणाऱ्या सामान्य गवतांची उदाहरणे – मधमाश्यांसाठी उपयुक्त फुलं देणारी:
| गवत/वनस्पतीचे
  नाव (स्थानिक) | शास्त्रीय
  नाव | वैशिष्ट्य | अधिक
  माहिती  | 
| दुर्वा
  / कुसळी 
 | Cynodon
  dactylon | लहानसे
  फुलं; जमिनीवर पसरणारं | 
 | 
| मुरडशेवाळ 
 | Celosia
  argentea | गुलाबी-पांढऱ्या
  फुलांचे तण | 
 | 
| टंचा
  / कवडस/ एकदांडी 
 | Tridax
  procumbens | मधमाश्यांसाठी
  आकर्षक पिवळसर फुलं | 
 | 
| घाणेरी 
 | Lantana
  camara | मधमाश्यांना
  आवडते फूल | 
 | 
| भुईआवळी 
 | Alysicarpus
  vaginalis | लहान
  रानवेली; पाणथळ जमिनीत फुलते | 
 | 
| रान
  अंबाडी 
 | Hibiscus
  cannabinus | मोठी
  फुलं; मधमाश्यांचे आकर्षण | 
 | 
| नाचणी
  गवत 
 | Eleusine
  indica | साधारण
  गवत, फुलण्याच्या काळात उपयुक्त | 
 | 
| साटरवा
  / खिरा 
 | Corchorus
  capsularis | रानभाजी
  म्हणून वापरले जाणारे झुडूप | 
 | 
| पिवळा
  भंगरा 
 | Sphagneticola calendulacae | जमिनीलगत
  पसरणारी पिवळी फुले | 
 | 
| पिवळी
  तीळवणी 
 | Cleome viscosa | पिवळी
  फुले मधमाश्यांना आकर्षित करतात | 
 | 
| मेंढा
  दुधी / उतरण 
 | Pergularia Deamia | आग्या
  मधमाशी खूप आकर्षित होते | 
 | 
| काटेरी
  राजगीर 
 | Amaranthus Spinosus | फुलोरी
  व डंखरहित मधमाशी खूप आकर्षित होते | 
 | 
| पटवट्या
  घास 
 | Calyptocarpus vialis | पिवळी
  छोटी फुले | 
 | 
| चांदणी 
 | Jatropha gossypifolia | लाल
  फुले, डंखरहित मधमाशी आकर्षित होते | 
 | 
| जंगली
  तुळस 
 | Croton bonplandianus | पांढरी
  फुले गुच्छ स्वरूपात  | 
 | 
| तरवड 
 | Senna auriculata | मधमाशांसाठी
  पराग व मकरंद देणारी उपयुक्त | 
 | 
| टंटणी 
 | Abutilon indicum | मधमाशांसाठी
  पराग व मकरंद देणारी उपयुक्त औषधी वनस्पती आहे. | 
 | 
| जंगली
  झेंडू 
 | Malvastrum
  coromandelianum | मधमाशांसाठी
  पराग स्रोत असलेली उपयुक्त जंगली फुलझाडे वनस्पती आहे | 
 | 
| करटूली
   
 | Momoridca charanita | मधमाशांसाठी
  परागसंपन्न फुले देणारी औषधी व उपयोगी वनस्पती आहे. | 
 | 
Sahaj Vichar
"कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी..." कविता प्रसिद्ध मराठी कवी श्री. ना. धों. महानोर य...
- 
युट्यूब व्हिडिओ: Click here *खपली गहू पेरणी:* ✔️पेरणी यंत्र असल्यास: एकरी 40 किलो बियाणे # रान हलके असल्यास: एकरी 50 किलो बिय...
- 
June Flowering Calendar (1 to 30) GodaGiri Farms Beekeeping Research and Training Centre Shrirampur, Ahmednagar, Maharashtra, India Email ...
 





































