Monday, September 4, 2023

आत्मा कृषी विभाग महाराष्ट्र शासन सूर्यफूल लागवड प्रोत्साहन व मधमाशी पालन प्रकल्प

19 जुलै, 2023: सूर्यफूल लागवड प्रशिक्षण व बियाणे वाटप 
आत्मा कृषी विभाग, श्रीरामपूर आयोजित सूर्यफूल पेरणी प्रकल्प बैठकीला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. मधमाशीपालन तज्ञ म्हणून या प्रकल्पात सूर्यफुलावर परागीकरणासाठी योगदान देत आहे. या योजनेंतर्गत प्रकल्पासाठी निवडलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला कृषी विभागाकडून मधमाश्यांच्या पेट्या दिल्या जातील. समन्वय आणि पाठिंब्याबद्दल मी सर्व कृषी विभाग टीम श्रीरामपूरचे आभार मानतो. (ऋषिकेश हरिभाऊ औताडे - 9960553407).
------------------------------------------------------------------------

1 व 2 सप्टेंबर 2023: लाभार्थी प्रशिक्षण कार्यक्रम 

Youtube link: Click here
बातमी:

*शेतकऱ्यांनी उद्योगतेची कास धरावी* : *मा.विलास नलगे (प्रकल्प संचालक आत्मा अहमदनगर)*

महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत श्रीरामपूर येथे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. आत्मा अंतर्गत श्रीरामपूर तालुक्यात खरीप हंगामात सूर्यफूल कृषी प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच सूर्यफूल लागवड प्रोत्साहन योजनेला मधमाशी पालन व्यवसायाची जोड मिळाल्यास आणि शेतकऱ्यांनी मध उत्पादन व त्यापासून उपपदार्थ निर्मिती केल्यास कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावेल. त्याचप्रमाणे मधु मक्षिका पालन हा जोड धंदा म्हणून देखील करता येईल. तसेच शेतकरी सूर्यफुलापासून तेल उत्पादन करू शकतात. व्यावसायिक शेतकरी निर्माण झाल्यास शासनाचा  प्रकल्प अंतर्गत या कार्यक्रमाचा हेतू देखील साध्य होईल असे प्रतिपादन अहमदनर आत्मा प्रकल्प संचालक विलास नलगे यांनी केले. मधुमक्षिका पालन प्रशिक्षण व कृषी संलग्न प्रात्यक्षिक कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना मधमाशी पेट्या वाटप कार्यक्रम नुकताच  1 व 2 सप्टेंबर 2023 रोजी श्रीरामपूर येथील प्रगतीशील शेतकरी डॉ. राम काळे यांच्या वस्तीवर पार पडला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर वरून  बोलत होते. यावेळी मधमाशी पालन प्रशिक्षक मार्गदर्शक म्हणून गोदागिरी फार्म्स मधमाशी पालन विभागाचे श्री ऋषिकेश औताडे यांनी उपस्थितांना मधुमक्षिका पालन बाबत  प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षण दिले. सदर प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी मा. राजाराम गायकवाड (प्रकल्प उपसंचालक आत्मा अहमदनगर),  मा. अविनाश चंदन (तालुका कृषी अधिकारी श्रीरामपूर),  श्री अभय थोरात (कृषी पर्यवेक्षक) , श्रीमती रंजना कटरनवरे (कृषी सहाय्यक) , श्रीमती मीनाक्षी बढे (बीटीएम), श्री अभिषेक मानकर (एटीएम) व प्रशिक्षणार्थी शेतकरी उपस्थित होते.
------------------------------------------------------------------------

10/09/2023 लाभार्थी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व भेट
व्हिडिओ लिंक: Click here

______________________________________________

7/10/2023: रब्बी हंगाम सूर्यफूल लागवड सुरुवात केली
______________________________________________
______________________________________________

T
______________________________________________
_____________________________________________

_____________________________________________
तेल काढणे 

Stingless Bees for Pollination

Click on the following links... https://youtu.be/3nB70YlR9Co?si=N9_BRW0eAB-jJ56m English  https://youtu.be/PzFz6xAZXiQ?feature=shared Hindi ...