Sunday, July 20, 2025

Sahaj Vichar

"कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी..."

कविता प्रसिद्ध मराठी कवी श्री. ना. धों. महानोर यांची आहे, या ओळीत कवी आपल्याला सांगतात की आपण देवाची शोधाशोध मंदिरांमध्ये, तीर्थक्षेत्रांमध्ये करतो. पण खरा देव आपल्या अंतःकरणात आहे. आपण बाहेर शोधत राहतो पण अंतर्मनातील भगवंत उपाशी राहतो.

जेव्हा विश्व शून्य होते, निर्विचार होते, क्षणात 
नगण्य सूर्य, चंद्र, ग्रह, पाणी, समुद्र निर्माण झाले. हे सर्व निर्माण करणारी शक्ती किती मोठी असेल किती उदार असेल. अशा शक्तीला अजाण मनुष्य पैसे, नैवद्य, पूजा अर्पण करून पावन करण्याचा निरर्थक प्रयत्न करतो. 
अशा शक्तीबद्दल जाणतेपने निर्विचार ध्यानातून कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच "सहजयोग".

.
माणसाने बनवलेल्या...
दगडात देव नाही,
मूर्तीमध्ये देव नाही,
फोटोमध्ये देव नाही, 
तो तुमच्या आजूबाजूला आणि तुमच्यात आहे,
अनुभवण्यासाठी ध्यानाला बसा,
तुमच्यातला देव, 
नंतर दिवसभर इतरांना अनुभवता येईल.... आणि तुम्ही देवमाणूस म्हणून गणले जाल. 
(प्रमाण - सर्व संत हेच सांगत आलेले आहेत)


"In every lifetime, the soul takes birth in different forms. In one life, it may be born as a Hindu, in another as a Muslim, and in another as a Christian. Therefore, instead of getting entangled in religious rigidity, if we see each individual as a soul, true communal harmony awakens. Through this awareness, and with the help of Sahaja Yoga, liberation (moksha) becomes possible."


देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ॥

जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर ।
जसे दुग्धा मध्ये लोनी, तसा देही चक्रपाणी ॥

देव देहात देहात, का हो जाता देवलात ।
तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना ॥

"मग आपण आपले मंदिर कसे ठेवले पाहिजे?"

सहजयोग, तुम्हाला तुमच्यातल्या मंदिरातील देवाशी जोडण्याचा उत्तम मार्ग दाखवेल.

*जय श्री माताजी*


करोडो वर्षापासून पृथ्वीवर सगळेकाही सुरळीत चालू आहे, म्हणजेच कुठेतरी, कोणीतरी नियोजन व काळजी करत आहे. त्याच्या प्रती कृतज्ञता म्हणजेच सहजयोग.

परमेश्वराने मानवाच्या उत्क्रांतीसाठी विविध अवतार घेतले. परंतु मानवाने अवतारांचे (वागण्याच्या पद्धतीचे) रूपांतर धर्मात (जगण्याच्या पद्धतीत) केले.

तुम्ही चांगले वागा, असे सांगण्या एवजी तुम्ही असेच जगा, तरच धर्म टिकेल असे जगजाहीर केले

Sahaj Vichar

"कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी..." कविता प्रसिद्ध मराठी कवी श्री. ना. धों. महानोर य...