Sunday, September 3, 2023

शेतकऱ्यांनी मधमाशी पेटीची काळजी कशी घ्यावी

1. मधमाशीला कृषी लक्ष्मीची उपमा दिली जाते, त्यामुळे आपल्या घरी लक्ष्मीच आपण घेऊन गेला आहात. त्यामुळे तिची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे.
2. मधमाशी पेटी सावलीतच ठेवावी, ठेवण्याची जागा सपाट असावी, जमिनीवर प्लास्टिक किंवा गोणी 3 x 3 फूट जागेवर अथरावे. त्यावर चार विटा व विटेवर चार पाण्याने भरलेल्या वाट्या ठेवाव्या. वाट्यामध्ये दिलेल्या स्टँडचे चार पाय बुडतील असे स्टँड ठेवावे. स्टँड वर पेटी समान लेव्हल वर ठेवावी. वाटीत असणारे पाणी लेव्हल दर 3 ते 4 दिवसाने चेक करावी. वाटीत असणारे पाणी स्वच्छ ठेवावे कारण मधमाश्या ते पाणी पितात.

3. पेटीचे मुख्य द्वार पूर्वेला ठेवावे. आजूबाजूला गवत किंवा झाडी झुडपे यांचा पेटीला स्पर्श पेटी होऊ न देणे. चारही बाजूने पेटीला हवेशीर जागा असावी. 

4. पेटी दर 12 ते 15 दिवसातून एकदा पूर्ण उघडून फ्रेम चेक करावे. तळपाट म्हणजे पेटीचा आतील भाग सर्व बाजूने साफ करावा. आपण केलेल्या तपासणीचा अहवाल सोबत दिलेल्या वहिमध्ये नमूद करावा.

5. जून ते ऑगस्ट, नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत पेटीला 15 दिवसातून एकदा 1 लिटर साखर-पाणी (300 g साखर  700ml पाणी) फिडर मध्ये द्यावे. वरील महिने सोडून जर तपासणी दरम्यान मध पेटी मध्ये कमी प्रमाणात दिसला किंवा पेटी आजारी असल्यास गरजे प्रमाणे साखर पाणी द्यावे. साखर पाणी शक्यतो संध्याकाळी 6 वाजेनंतर द्यावे, आपल्याकडील सर्व पेट्याना द्यावे. एका पेटी दिले आणि दुसऱ्या पेटी नाही दिले असा भेद भाव करू नये.

6. तपासणी दरम्यान पेटीच्या आजूबाजूला किंवा पेतीमध्ये माश्या मेलेल्या अधळल्या तर त्याचा फोटो ग्रुप वर टाकावा किंवा फोन करून आम्हाला (9960553407/ 8600840056) सांगावे.

7. पेटीच्या ठेवलेल्या 3 किलोमीटर परिघामधील शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी करायची असल्यास पेटी धारक मालक यांना त्याबाबत माहिती असावी. कीटक नाशक फवारणी शक्यतो रात्री 8 वाजेनंतर करावी. 

8. दिवसा कीटक नाशक फवारणी नाईलाजास्तव करायची असल्यास पेटीद्वार अधल्या रात्री बंद करून घ्यावी. पेटीला मुख्य द्वार सोडून जर इतर ठिकाणी छिद्र असल्यास ते वर्तानपत्राद्वारे किंवा माती- शेण या द्वारे बंद करून घ्यावे. बंद केल्या जाणाऱ्या पेटविला आतमध्ये फिडर मध्ये 500 मिली साखर पाणी द्यावे. आदल्या दिवशी रात्री 8 वाजता पेटी बंद केली तर दुसऱ्या दिवशी 8 वाजता पेटी द्वार उघडावे म्हणजे (48 तास आपण पेटी बंद ठेऊ शकतो आणि कीटक नशकाच्या त्रासापासून त्यांना वाचवू शकतो). शक्यतो पीक आंतरप्रवाही कीटकनाशक द्यावे, स्प्रे किंवा पावडर कीटक नाशक वापरू नये. 

9. मधमाश्या पेटी व्यवस्थित काम करते की नाही हे बघायचे असल्यास सकाळी साधारण उन पडल्यावर 8 ते 9 या वेळेत किती मधमाश्या बाहेर जातात व येणाऱ्या माश्यांच्या पायाला पराग/ पोलन लागून येत आहे का ते बघावे. चांगली काम करणारी पेटी म्हणजे 20 माष्यानी 1 मिनिटात पराग/ पोलन आनने आवश्यक आहे. एकाही माशी बाहेर येताना किंवा आत जाताना  दिसत दिसत नसल्यास आम्हाला कळवावे ((9960553407/ 8600840056). 

10. पेटी दिल्यानंतर एक भेट आमच्या द्वारे मोफत असेल, त्या भेटीत आपल्याला आमच्या उपस्थिती मध्ये आपल्याला पेटी बद्दल सर्व माहिती, नोंद करणे व पेटी स्वछता करणे शिकविले जाईल. *शक्यतो घरच्या महिला पेटीची काळजी चागली घेऊ शकतात, त्यांना उपस्थित ठेवावे. 

11. गरजेनुसार पुढील सूचना दिल्या जातील.

No comments:

Post a Comment

Stingless Bees for Pollination

Click on the following links... https://youtu.be/3nB70YlR9Co?si=N9_BRW0eAB-jJ56m English  https://youtu.be/PzFz6xAZXiQ?feature=shared Hindi ...