श्री. ऋषिकेश हरिभाऊ औताडे एम. एस्सी.- जैवतंत्रज्ञान, (वय ३८) मो. नं. 9960553407 मु. इंदिरानगर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर यांनी बायो-टेक्नॉलॉजीसारख्या आव्हानात्मक विज्ञान शाखेतून पदवी व पदव्युत्तर पदवी (बी. एस्सी. 2007 व एम. एस्सी. 2009) प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, 2010 साली त्यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाशी सल्लग्नित असलेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे सहायक प्राध्यापक, उप प्राचार्य व. प्रभारी प्राचार्य अशा विविध पदांवर 12 वर्ष नोकरी केली. परंतु, प्रशासन व नियोजन जबाबदारीतून विद्यार्थी व शेतकरी यांच्याशी संवाद कमी झाल्याने त्यांनी मार्च २०२२ साली दोन्ही पदाचा राजीनामा दिला व गोदागिरी फार्म्स या फार्मची स्थापना केली. त्यांनी एप्रिल-मे, २०२२ काळात राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था, हैदराबाद (मॅनेज) यांच्या सलग्न नाशिक येथील प्रशिक्षण संस्था एशिअन येथे ४५ दिवसाचा ॲग्री क्लिनिक व ॲग्री बिझनेस सेंटर कोर्स (AC & ABC) पूर्ण केला.
कृषी क्षेत्रातील सर्वाधिक महत्त्वाची 'जैविक निविष्ठा' मानल्या गेलेल्या मधमाशीशी निगडित उद्योगाचा शुभारंभ त्यांनी 2022 साली केला. गोदागिरी फार्म्स अंतर्गत त्यांनी प्रामुख्याने मधमाशी पालन, गांडूळ खत उत्पादन, ऑयस्टर मशरूम बीज उत्पादन या बरोबरच शेतकरी, शाळा आणि महाविद्यालये इत्यादींपर्यंत या तीन तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. "वेस्ट, टू व्हॅल्यू, टू सस्टेनेबल एन्व्हायर्नमेंट, टू एंटरप्रेन्योरशिप" या थीमला अनुसरून ते ऑफलाइन/ऑनलाइन प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षणाद्वारे जागरूकता पसरवत आहोत. आज पर्यंत त्यांनी ५०० हून जास्त शेतकरी, विद्यार्थी, शिक्षण, बेरोजगार तरुण यांना प्रशिक्षण व व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन दिले आहे.
श्री. औताडे यांनी व्यवसाय म्हणून मधमाशी पालनाची निवड केल्यानंतर; पुण्याच्या मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्थेतून एक महिन्याचे मधमाशी पालनाचे (डिसेंबर २०२१) व तसेच ऑगस्ट २०२२ एकदिवसीय मध तपासणीचे रीतसर प्रशिक्षण घेतले. त्याचप्रमाणे महाबळेश्वरस्थित खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचालनालयातून दहा दिवसांचे मधपाळ प्रशिक्षणही जानेवारी २०२३ मध्ये पूर्ण केले. तसेच, पंजाब कृषी विद्यापीठ येथे राणी माशी पैदास प्रशिक्षण त्यांनी 2024 मध्ये पूर्ण केले.
सध्या श्री. ऋषिकेश औताडे एपिस मेलिफेरा, एपिस सेरेना व ट्रायगोना जातींच्या मधुपेट्यांचा परागीभवनासाठी पुरवठा अहमदनगर जिल्ह्यातील टरबूज, डाळिंब, कांदा बियाणे व आंबा उत्पादक शेतकरी यांस पुरवठा करत आहेत. त्याच बरोबर मध विक्री, प्रशिक्षण व प्रकल्प हाताळत आहेत. 58 एपिस मेलिफेरा, 30 ट्रायगोना व 10 एपिस सेरेना वसाहती आहेत. याद्वारे त्यांनी 2022 - 2023 व 2023 - 2024 हंगामामध्ये नेवासा (11 शेतकरी), श्रीरामपूर (13 शेतकरी), राहाता (8 शेतकरी), राहुरी (10 शेतकरी), रायगड-म्हसाळा (१ शेतकरी), पैठण (4 शेतकरी), कोपरगाव (5 शेतकरी), अहमदनगर (6 शेतकरी), संगमनेर (4 शेतकरी) अशा विविध गावांमध्ये मधमाशी परागीभवन सेवा दिली आहे.
मराठी भाषेमध्ये सोशल मीडियावर मधमाशी पालनाविषयी खूपच कमी माहिती टाकली जाते. म्हणूनच त्यांनी मधमाशी पालन करतानाचे दैनंदिन अनुभव व माहिती आपण यूट्यूब, फेसबुक, लिंक्डइन, इन्स्टाग्राम, ट्विटर, वेबसाईट व ब्लॉगद्वारे प्रदर्शित केले आहे.
2:.
श्री. ऋषिकेश हरिभाऊ औताडे एम. एस्सी.- जैवतंत्रज्ञान, (वय ३८) मो. नं. 9960553407 मु. इंदिरानगर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर यांनी बायो-टेक्नॉलॉजीसारख्या आव्हानात्मक विज्ञान शाखेतून पदवी व पदव्युत्तर पदवी (बी. एस्सी. 2007 व एम. एस्सी. 2009) प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, 2010 साली त्यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाशी सल्लग्नित असलेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे सहायक प्राध्यापक, उप प्राचार्य व. प्रभारी प्राचार्य अशा विविध पदांवर 12 वर्ष नोकरी केली. परंतु, प्रशासन व नियोजन जबाबदारीतून विद्यार्थी व शेतकरी यांच्याशी संवाद कमी झाल्याने त्यांनी मार्च २०२२ साली दोन्ही पदाचा राजीनामा दिला व गोदागिरी फार्म्स या फार्मची स्थापना केली. त्यांनी एप्रिल-मे, २०२२ काळात राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था, हैदराबाद (मॅनेज) यांच्या सलग्न नाशिक येथील प्रशिक्षण संस्था एशिअन येथे ४५ दिवसाचा ॲग्री क्लिनिक व ॲग्री बिझनेस सेंटर कोर्स (AC & ABC) पूर्ण केला.
कृषी क्षेत्रातील सर्वाधिक महत्त्वाची 'जैविक निविष्ठा' मानल्या गेलेल्या मधमाशीशी निगडित उद्योगाचा शुभारंभ त्यांनी 2022 साली केला. गोदागिरी फार्म्स अंतर्गत त्यांनी प्रामुख्याने मधमाशी पालन, गांडूळ खत उत्पादन, ऑयस्टर मशरूम बीज उत्पादन या बरोबरच शेतकरी, शाळा आणि महाविद्यालये इत्यादींपर्यंत या तीन तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. "वेस्ट, टू व्हॅल्यू, टू सस्टेनेबल एन्व्हायर्नमेंट, टू एंटरप्रेन्योरशिप" या थीमला अनुसरून ते ऑफलाइन/ऑनलाइन प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षणाद्वारे जागरूकता पसरवत आहोत. आज पर्यंत त्यांनी ५०० हून जास्त शेतकरी, विद्यार्थी, शिक्षण, बेरोजगार तरुण यांना प्रशिक्षण व व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन दिले आहे.
श्री. औताडे यांनी व्यवसाय म्हणून मधमाशी पालनाची निवड केल्यानंतर; पुण्याच्या मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्थेतून एक महिन्याचे मधमाशी पालनाचे (डिसेंबर २०२१) व तसेच ऑगस्ट २०२२ एकदिवसीय मध तपासणीचे रीतसर प्रशिक्षण घेतले. त्याचप्रमाणे महाबळेश्वरस्थित खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचालनालयातून दहा दिवसांचे मधपाळ प्रशिक्षणही जानेवारी २०२३ मध्ये पूर्ण केले. तसेच, पंजाब कृषी विद्यापीठ येथे राणी माशी पैदास प्रशिक्षण त्यांनी 2024 मध्ये पूर्ण केले.
सध्या श्री. ऋषिकेश औताडे एपिस मेलिफेरा, एपिस सेरेना व ट्रायगोना जातींच्या मधुपेट्यांचा परागीभवनासाठी अहमदनगर जिल्ह्यातील टरबूज, डाळिंब, कांदा बियाणे व आंबा उत्पादक शेतकरी यांस पुरवठा करत आहेत. त्याच बरोबर मध विक्री, प्रशिक्षण व प्रकल्प हाताळत आहेत.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन
नाशिक येथील ह्युमन सर्व्हिस फाउंडेशनने 2024 चा
कृषिथॉन - युवा कृषी उद्योजक
पुरस्कार त्यांना प्रदान केला. तसेच मा. आमदार स्व. जयंतराव ससाणे स्मृती पुरस्कार 2024 निमित्ताने त्यांना कृषी रत्न पुरस्कार ज्येष्ठ नेते मा. श्री. दिग्विजय सिंघ यांच्या हस्ते प्रदान झाला. पूर्वा केमटेक - बसवंत गार्डन नाशिक यांनी त्यांना 2023 मध्ये युवा मधूक्रांती उद्योजक पुरस्कार देऊन गौरविले.
No comments:
Post a Comment