Friday, July 26, 2024

Bee in Yoga

*आसनाचा योग*
योग आसने रोगमुक्ती व शरीरस्वास्थ्य देतात, पण पतंजली यांनी या हेतूंसाठी ती शोधून काढली नव्हती. 

मनःस्वास्थ्य व अध्यात्मिक अनुभूती ही त्यांची खरी उद्दिष्टे. या दृष्टीने ती कसरत वा व्यायाम म्हणून करता कामा नये. त्यात हालचाल अपरिहार्य, म्हणूनच आवश्यक. ती सावकाश, नियंत्रित, झटक्याविना हवी. 

श्वसन हालचालीत नियंत्रित करावे, पण आसनस्थितीत नैसर्गिक असावे. आसनाची कृती व वेळ ही दोन्ही, ताण सहज सहनशक्तीतच राहील अशी मर्यादित करावीत.

अष्टांग योगा 
1. यम - अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचारी, अपरिग्रह 
2. नियम - शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरपरिधान 
3. आसन 
4. प्राणायाम
5. प्रत्याहार 
6. धारणा 
7. ध्यान 
8. समाधी 




No comments:

Post a Comment

*"तण देईल धन – एक हरवलेलं नातं"* ऋषिकेश औताडे, मधमाशी पालक, गोदागिरी फार्म, श्रीरामपूर

तण देईल धन – एक हरवलेलं नातं ऋषिकेश औताडे , मधमाशी पालक , गोदागिरी फार्म , श्रीरामपूर मोबा. ९९६०५५३४०७ इमेल: godagirifarms @ gmai...