Friday, September 13, 2024

Beewax

Vasline/ Petroleum jelly can’t be used as a hydrate, it may retain the existing hydration but doesn’t provide any additional. It may end up drying your lips further during those hot, humid, sunny days. As name suggests it's *Petroleum Jelly* do you want to use petroleum products to your skin?

Beeswax, on the other hand, is completely natural. It has moisturizing, hydrating, healing, properties that keep your lips soft, supple, & plump. It lets your skin breathe thoroughly, doesn’t clog pores, and keeps it well hydrated on warm, sunny days. It’s a popular moisturizing compound as it contains natural emulsifiers. Beeswax also has small amounts of antibacterial agents which protects skin.


*व्हॅस्लीन की मेण लीप बाम*


व्हॅस्लीन/पेट्रोलियम जेलीचा वापर हायड्रेट म्हणून केला जाऊ शकत नाही, ते हायड्रेशन टिकवून ठेवू शकते परंतु कोणतेही अतिरिक्त प्रदान करत नाही.  थंडीच्या दिवसांमध्ये तुमचे ओठ / त्वचा आणखी कोरडे होऊ शकतात.  तसेच, पेट्रोलियम जेली त्वचेचे छिद्र बंद करते त्यामुळे घाम, धूळ, प्रदूषण, विषारी पदार्थ जमा होतात ज्यामुळे त्वचा/ ओठ काळे होतात.


नावाप्रमाणेच हे *पेट्रोलियम जेली* आहे तुम्हाला तुमच्या त्वचेसाठी पेट्रोलियम उत्पादने वापरायची आहेत का?


 दुसरीकडे, मेण वापरून बनवलेले लीपबाम पूर्णपणे नैसर्गिक आहे.  त्यात मॉइश्चरायझिंग, हायड्रेटिंग, बरे करण्याचे गुणधर्म आहेत जे तुमचे ओठ / त्वचा मऊ, लवचिक आणि मोकळे ठेवतात.  हे तुमच्या त्वचेला पूर्णपणे श्वास घेऊ देते, छिद्र बंद करत नाही आणि थंडीच्या दिवसांमध्ये ते चांगले हायड्रेटेड ठेवते.  हे एक लोकप्रिय मॉइश्चरायझिंग कंपाऊंड आहे कारण त्यात नैसर्गिक इमल्सीफायर्स आहेत.  मेनामध्ये कमी प्रमाणात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक देखील असतात जे त्वचेचे संरक्षण करतात.


Beeswax is produced by bees; therefore, they are completely natural and renewable, which makes beeswax candles sustainable and environmentally friendly. Paraffin wax also called “petroleum wax” is derived from petroleum, coal, and oil shale and carcinogenic.


Which candles you will prefer - 

Beewax or Paraffin wax?

Friday, September 6, 2024

बागेत मधमाश्या पेट्या कश्या ठेवाव्यात?


महाराष्ट्रामध्ये डाळिंब उत्पादक किंवा फळ पिके उत्पादक (टरबूज, खरबूज) व मधमाशी पालक मधमाशी पेट्या बागेच्या आत प्रत्येक सरीला ठेवतात. हे चुकीचे आहे, पेट्या ह्या बांधावर एकत्र ठेवायला हव्या त्यामुळे मधमाश्यांना पेट्या पर्यंत पुन्हा येण्यासाठी अडचण येत नाही व उडण्यासाठी जागा मिळते. बागेत सर्वच झाडे फुले सारखी दिसत असल्याने त्यांना पेटी शोधण्यास अडचण होते, व मधमाश्या भटकण्याची शक्यता असते. तसेच, शेतकऱ्यास मधमाश्या काम करतात की नाही हे पूर्ण बागेत फिरत बसण्या पेक्षा बांधावर ठेवलेल्या पेट्यांजवळ जाऊन बघता येते. 

तसेच बांधावर हवा खेळती असते त्यामुळे मधमाश्यांचे आरोग्य चांगाचे राहते. बऱ्याच वेळा बागेत फवारणी यंत्र व इतर अवजारे वापरावी लागतात व पेट्या बागेच्या आत ठेवल्यास त्याचे दवबिंदू पेटीमध्ये जाऊन मधमाश्यांना केमिकलचा त्रास होतो. वरील दिलेल्या चित्रात दाखवल्या प्रमाणे पेटी नेहमी मोकळ्या जागेत ठेवाव्यात, मधमाश्या आपल्या बागेत जातील कारण त्यांचा फुले शोधण्याचा परिसर हा 2 ते 3 किलोमिटर पर्यंत असतो.

खरा मध म्हणजे काय ?

मधात साखर तयार होणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. मधामधे असलेल्या फ्रुटोज व ग्लुकोज यांच्या गुणोत्तरावर साखर जमा होइल की नाही हे ठरते. उदाहरन द्यायचे झाले तर सूर्यफूल, मोहरी, जांभूळ मध यात ग्लुकोजचे प्रमाण (%) हे फ्रुटोज पेक्षा जास्त असते त्यामुळे मध काढल्यानंतर त्यात लवकर साखर तयार होते. बाभूळ, ओवा यात ग्लुकोजचे प्रमाण (%) हे फ्रुटोज पेक्षा कमी असते त्यामुळे अशा मधात क्वचितच साखर जमा होते. साखर जमा झालेल्या मधला क्रीम हनी म्हणतात व भारतीय सूर्यफूल/ मोहरी क्रीम हनी साठी बाहेरच्या देशात खूप मागणी असते. 

साखर जमा होऊ नये यासाठी मोठ मोठ्या कंपन्या त्यावर प्रोसेसिंग करतात, परंतु प्रोसेसींग मध्ये मधाला दिल्या जाणाऱ्या तापमानामुळे मधातील बहुसंख्य तत्व नष्ट होतात. त्यामुळे, ग्राहकांनी रॉ/ ओरिजनल मधाची जर मागणी केली तर तसा पुरवठा होऊन, खऱ्या नैसर्गिक मधाचा गोडवा चाखता येईल. खरे तर मध जर पूर्ण परिपक्व झालेला असेल तर त्याला प्रोसेसींग करायची गरज पडत नाही. मधमाश्याच ह्या उत्कृष्ट प्रोसेसींग इंजिनियर आहेत, मध पक्व (पाण्याचे प्रमाण 20% तर शर्करेचे प्रमाण 80 % ) झाल्यावर तो मध अधिक काळ टिकावा यासाठी मधमाश्या त्या मधावर मेणाचा थर चढवतात आणि असा मध जेंव्हा मधमाशी पालक काढतो तो मध खरा लाभदायक. परंतु हल्ली उत्पन्न व पुरवठा यात खूप अंतर असल्याने हव्यासापोटी मध पक्व होण्याची वाट बघायला वेळ कोणाला नाही. त्यामुळे अपरिपक्व मध (पाण्याचे प्रमाण 20 % पेक्षा जास्त) काढून त्यावर प्रोसेसींग करून तो कृत्रिम रित्या / शास्त्रीय पद्धतीने (परंतु अनैसर्गिक रित्या) पक्व केला जातो आणि विकला जातो. 

भेसळ केलेल्या / विकत घेतलेल्या मधात सुध्धा साखर तयार होते आणि रॉ/ नैसर्गिक  मधात सुध्दा साखर तयार होते. मग ग्राहकांना प्रश्न पडतो की खरा मध कोणता. त्याला उत्तर एकच की आपण आपल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मधमाशी पलकास संपर्क करून, त्याच्या कडे असलेला मध विकत घेणे व तो करत असलेल्या व्यवसायास हातभार लावणे. मधमाशी पालकास सांगा साखर तयार झाली तरी चालेल परंतु आम्हाला परिपक्व झालेलाच रॉ/ नैसर्गिकच मध दया. मध ही निसर्गातील सगळ्यात अमूल्य असे अन्न असून, त्याची शुद्धता टिकवण्याची जबाबदारी ही मधमाशी पालक व ग्राहक ह्या दोघांची आहे. 

*जनहितार्थ* 
- गोदागिरी फार्म्स, श्रीरामपूर 
(मोबा. - 9960553407)

Sunday, September 1, 2024

Internship Activities

1. Adding customers to WhatsApp group and keep them updated

2. JabRef reference manager software

3. Index preparation

4. Effective presentation in exhibitions


Next to learn:

1. WhatsApp Catalogue preparation

2. Power Point presentation

3. Certificate Preparation

4. Social media platform


परागीकरणासाठी मधमाशी पेट्यांचे व्यवस्थापन

*फळबागेत मधमाश्यांची पेटी योग्य पद्धतीने ठेवावी. https://youtu.be/ZWiR5uRfPIg?si=vEpnqTi89Fiua-qS नि-सर्गात परागीकरण...