Friday, September 6, 2024

खरा मध म्हणजे काय ?

मधात साखर तयार होणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. मधामधे असलेल्या फ्रुटोज व ग्लुकोज यांच्या गुणोत्तरावर साखर जमा होइल की नाही हे ठरते. उदाहरन द्यायचे झाले तर सूर्यफूल, मोहरी, जांभूळ मध यात ग्लुकोजचे प्रमाण (%) हे फ्रुटोज पेक्षा जास्त असते त्यामुळे मध काढल्यानंतर त्यात लवकर साखर तयार होते. बाभूळ, ओवा यात ग्लुकोजचे प्रमाण (%) हे फ्रुटोज पेक्षा कमी असते त्यामुळे अशा मधात क्वचितच साखर जमा होते. साखर जमा झालेल्या मधला क्रीम हनी म्हणतात व भारतीय सूर्यफूल/ मोहरी क्रीम हनी साठी बाहेरच्या देशात खूप मागणी असते. 

साखर जमा होऊ नये यासाठी मोठ मोठ्या कंपन्या त्यावर प्रोसेसिंग करतात, परंतु प्रोसेसींग मध्ये मधाला दिल्या जाणाऱ्या तापमानामुळे मधातील बहुसंख्य तत्व नष्ट होतात. त्यामुळे, ग्राहकांनी रॉ/ ओरिजनल मधाची जर मागणी केली तर तसा पुरवठा होऊन, खऱ्या नैसर्गिक मधाचा गोडवा चाखता येईल. खरे तर मध जर पूर्ण परिपक्व झालेला असेल तर त्याला प्रोसेसींग करायची गरज पडत नाही. मधमाश्याच ह्या उत्कृष्ट प्रोसेसींग इंजिनियर आहेत, मध पक्व (पाण्याचे प्रमाण 20% तर शर्करेचे प्रमाण 80 % ) झाल्यावर तो मध अधिक काळ टिकावा यासाठी मधमाश्या त्या मधावर मेणाचा थर चढवतात आणि असा मध जेंव्हा मधमाशी पालक काढतो तो मध खरा लाभदायक. परंतु हल्ली उत्पन्न व पुरवठा यात खूप अंतर असल्याने हव्यासापोटी मध पक्व होण्याची वाट बघायला वेळ कोणाला नाही. त्यामुळे अपरिपक्व मध (पाण्याचे प्रमाण 20 % पेक्षा जास्त) काढून त्यावर प्रोसेसींग करून तो कृत्रिम रित्या / शास्त्रीय पद्धतीने (परंतु अनैसर्गिक रित्या) पक्व केला जातो आणि विकला जातो. 

भेसळ केलेल्या / विकत घेतलेल्या मधात सुध्धा साखर तयार होते आणि रॉ/ नैसर्गिक  मधात सुध्दा साखर तयार होते. मग ग्राहकांना प्रश्न पडतो की खरा मध कोणता. त्याला उत्तर एकच की आपण आपल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मधमाशी पलकास संपर्क करून, त्याच्या कडे असलेला मध विकत घेणे व तो करत असलेल्या व्यवसायास हातभार लावणे. मधमाशी पालकास सांगा साखर तयार झाली तरी चालेल परंतु आम्हाला परिपक्व झालेलाच रॉ/ नैसर्गिकच मध दया. मध ही निसर्गातील सगळ्यात अमूल्य असे अन्न असून, त्याची शुद्धता टिकवण्याची जबाबदारी ही मधमाशी पालक व ग्राहक ह्या दोघांची आहे. 

*जनहितार्थ* 
- गोदागिरी फार्म्स, श्रीरामपूर 
(मोबा. - 9960553407)

No comments:

Post a Comment

Practical Beekeeping

  स्वागत माधुबनाची ओळख मधमाशी पालनासाठी लागणारे कीट व वस्तू सातेरी पेटीचे विविध भाग व स...