महाराष्ट्रामध्ये डाळिंब उत्पादक किंवा फळ पिके उत्पादक (टरबूज, खरबूज) व मधमाशी पालक मधमाशी पेट्या बागेच्या आत प्रत्येक सरीला ठेवतात. हे चुकीचे आहे, पेट्या ह्या बांधावर एकत्र ठेवायला हव्या त्यामुळे मधमाश्यांना पेट्या पर्यंत पुन्हा येण्यासाठी अडचण येत नाही व उडण्यासाठी जागा मिळते. बागेत सर्वच झाडे फुले सारखी दिसत असल्याने त्यांना पेटी शोधण्यास अडचण होते, व मधमाश्या भटकण्याची शक्यता असते. तसेच, शेतकऱ्यास मधमाश्या काम करतात की नाही हे पूर्ण बागेत फिरत बसण्या पेक्षा बांधावर ठेवलेल्या पेट्यांजवळ जाऊन बघता येते.
तसेच बांधावर हवा खेळती असते त्यामुळे मधमाश्यांचे आरोग्य चांगाचे राहते. बऱ्याच वेळा बागेत फवारणी यंत्र व इतर अवजारे वापरावी लागतात व पेट्या बागेच्या आत ठेवल्यास त्याचे दवबिंदू पेटीमध्ये जाऊन मधमाश्यांना केमिकलचा त्रास होतो. वरील दिलेल्या चित्रात दाखवल्या प्रमाणे पेटी नेहमी मोकळ्या जागेत ठेवाव्यात, मधमाश्या आपल्या बागेत जातील कारण त्यांचा फुले शोधण्याचा परिसर हा 2 ते 3 किलोमिटर पर्यंत असतो.
No comments:
Post a Comment