*अभिनंदन आपण आजपासून मधमाशी पालक झालात*
डंख रहित मधमाशी (Stingless Bee) म्हणजेच Trigona जातीच्या मधमाशा. या मधमाश्या लहान आकाराच्या असून डंख करत नाहीत, त्यामुळे त्यांचे पालन अधिक सुरक्षित मानले जाते. अशा मधमाश्यांची पेटी सांभाळताना खालील काळजी घेणे आवश्यक आहे:
डंख रहित मधमाशी पेटी काळजी:
1. स्थान निवड:
पेटी सावलीत ठेवा (उदा. झाडाखाली किंवा शेडमध्ये).
पाऊस व सूर्यप्रकाश थेट येणार नाही, याची दक्षता घ्या.
पडणाऱ्या पावसाने पेटी ओली होऊ देऊ नये किंवा तिला प्लास्टिक पिशविणे कव्हर करावे, वाहणाऱ्या किंवा थांबणाऱ्या पाण्यापासून दूर ठेवा.
2. वातावरण व तापमान:
मधमाश्यांसाठी सुमारे 20-35°C तापमान आदर्श असते.
खूप थंड हवामानात पेटीवर कापड/पोते झाकणे.
3. अन्नसाठा / खाद्यपुरवठा:
परागसंग्रहासाठी आसपास विविध फुलझाडे लावा सगळ्यात जास्त मध देणारी सूर्यफूल, मोहरी, बडीशेप, चीया सीड, तुळस, करडई, ओवा इत्यादी आलटून पालटून कुंडीत लावावी.
4. पेटीची देखभाल:
2 ते 3 दिवसातून एकदा पेटीचे बाहेरून निरीक्षण करा.
लाल-काळ्या-मुंगळे मुंग्या, सरडे, पाली यांच्यापासून पेटीचे संरक्षण करा.
उपद्रवी कीटकांपासून संरक्षण – वैज्ञानिक शिफारसी.
मुंग्या / मुंगळे (Ants):
पेटीच्या स्टँडच्या पाया खाली पाणी / तेल असलेली वाटी ठेवावेत – मुंग्या चढू शकत नाहीत.
पेटीच्या स्टँडच्या पायांना किंवा टांगलेली असेल तर दोरीला
व्हॅसलीन/ग्रीस लावा.
मुंग्यांच्या वसाहती पेटीजवळ आढळल्यास लगेच नष्ट करा.
पक्षी व सरपटणारे प्राणी:
यांचे पासून संरक्षन करण्यासाठी पेटी उंचीवर टांगून ठेवावी.
5. मध काढणी वेळ:
मध काढताना हळूवारपणे हाताळा. मध काढणीचा अनुभव असलेल्या मधमाशी पालकांकडू मध काढून घ्या.
6-8 महिने पेटी स्थिर असली की मध काढणी करता येते.
केवळ अतिरिक्त मध काढा, बाकीचा त्यांना राहू दया.
6. संवर्धन:
मजबूत व आरोग्यदायी पेटीपासून विभाजन करून नवीन पेट्या तयार करता येतात.
विभाजन करताना अनुभव असलेल्या मधमाशी पालकांकडू विभाजन करून घ्यावे.
No comments:
Post a Comment